जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने;कांद्याचा दर पोहोचला 5 हजार रुपयांवर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर 5 हजारापर्यंत पोहोचले आहे.तर 11सप्टेंबरला कांद्याचे दर 4700 रुपये इतके होते.आज कांद्याचे दर 5 हजार रुपये पर्यंत पोहोचले असून 300 रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत.
कर्नाटकातील इंडी,विजयपूर त्यासोबतच तेलंगणा मधून सोलापुरात कांद्याची अवक झाली आहे.शिवाय कलबुर्गी, आळंद,अफलपूर या कर्नाटकातील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे.विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे दोन दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहे.केंद्र सरकाराने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही तर कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नवीन कांद्याचे दर 45 रुपये प्रतिकिलो तर जुना कांद्याचे दर 50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
दरम्यान नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत.
Leave a Reply