साचलेल्या पाण्यात रोगराईचे किडे….
सोलापूर हैदराबाद रोड वरील नवाज हॉटेल समोरील गणेश नगर येथील नागरीक मागील अनेक दिवसांपासून समस्येच्या विळख्यात आहेत.
पावसाचे पाणी साचून या भागातील रस्त्यावर पाणी साचून त्यावर हिरवळी व किड्यांची पैदासही मोठ्या प्रमाणात होत आहे.
पाण्याचा निचरा होत नसल्याने साचून राहीलेल्या पाण्यातून डेंग्यू, मलेरीया व साथीचे आजारांना या भागातील नागरिक समोरे जात आहेत.
एक ना अनेक वेळा ही बाब पालीका व झोन अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील समस्येवर उपाय होत नसल्याने या भागातील नागरीकांना तोडंदाबून बूक्यांच्या मारा सहन करण्याची वेळ आली आहे.
अखेर संबधीत अधिकाऱ्यांना जाग येईल तर कधी???
Leave a Reply