शाळेच्या आवारात घुडगाभर पाणी,विद्यार्थ्यांची सुट्टी तर शिक्षकांची ताराबंळ,
सोलापूर शहरासह ग्रामीण भागात व उपनगरात काल सायंकाळच्या सुमारास पावसाने चांगलाच झोडपून काडला. ऐन शाळा सूटण्याची वेळ त्यातच पावसाची हजरीलागल्याने शाळेय विद्यार्थ्यांसह पालकांची दमछाकच उढाली. सखल भागात पावसाचा पाणी साचून अनेक भागात तलावाचे स्वरूपच आले. रात्रभर मुसळधार बरसत असलेल्या पावसाने जूना विडी घरकुल परीसरातील
संभाजीराव शिंदे विद्यामंदीर संचलित राज मेमोरियल इंग्लिस स्कुल विडी घरकुल शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचा स्वरूपच आला. सकाळच्या सत्रातील शिक्षक ,विध्यार्थी, पटांगणात साचलेल्या पाण्याला पाहून आवाकच झाले. संपूर्ण पटांगणात घूडघाभर पाणी साचल्याचे पाहून अनेक पालक आपल्या पाल्यांना आल्यात्या पावलांनी घरी परत नेले. काही शिक्षक साचलेल्या पाण्यातून वाट काढत शाळेत प्रवेशतर केले पण विद्यार्थ्यीच शाळेत आले नसल्याने सकाळच्या सत्रातील शाळेला सूट्टी देण्यात आली असल्याची माहीती काही पालकांकडून मिळाली. शाळेच्या आवारासह या भागातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचा स्वरूपच आला. साचलेल्या पाण्यातुन वाटचाल करत या भागातील नागरिकांना मात्र तारेवरची कसरतच करावी लागली.
Leave a Reply