महावितरणकडून थकीत वीजबिलांची वसुली व थकबाकीदारांची वीज खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे…..
यादरम्यान त्यांना काही ग्राहकांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की किंवा मारहाणीचा सामना करावा लागतोय.. अशीच एक घटना सोलापूर शहरातील लोधी गल्ली येथे आज घडली एम एस ई बी महिला टेक्निशियन चित्रा वाघ व त्यांचे सहकारी थकीत बिल गोळा करण्यासाठी लोधी गल्ली येथे गेले असता एका वीज ग्राहकाने.. चित्रा वाघ यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाठी केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे..
प्रकरण एवढं वाढले की या ठिकाणी पोलिसांना बोलावून घ्यावे लागले.. पोलीस येण्याची माहिती कळताच सदरचे दोन युवक पसार झाले आहेत..वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना प्रतिकुल परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना तर दुसरीकडे वीजबिल वसुलीसाठी मारहाणीच्या प्रकारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. शासकीय कामात अडथळा, अपशब्द वापरणे, धमकी, मारहाण, कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड, सरकारी मालमत्तेचे नुकसान, अनधिकृत जमाव गोळा करणे आदी प्रकाराविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
लोकप्रधान न्यूजसी बोलताना चित्रा वाघ म्हणाला की.. सदरच्या दोन्ही अज्ञात इसमावर रीतसर तक्रार करणार असून जोपर्यंत ते लाईट बिल भरत नाही तोपर्यंत त्यांचे वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे म्हणत शहराच्या वीज ग्राहकांना त्यांनी आवाहनही केल.. काय म्हणाल्या चित्रा वाघ पहा…
Leave a Reply