सोलापुरात आदिवासी कोळी समाज्यातील दोन उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली…
सोलापूर शहरातील जिल्हा परिषद पुनम गेट समोर सुरु
असलेल्या महादेव कोळी टोकरी कोळी मल्हार कोळी ढोर कोळी समाजाच्या सुलभ पध्दतीने जातीचा दाखले जात वैधता प्रमाणपत्र आदि मागण्यांसंदर्भात २५ सप्टेंबर २०२४ पासुन अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले.
सोलापूर जिल्हा परिषद समोरील पुनम गेट समोर महादेव कोळी टोकरी कोळी, मल्हार कोळी ढोर कोळी समाजाचे बाळासाहेब बळवंतराव दत्ता भाऊ सुरवसे अभिमान घंटे,सुरज खडाखडे आणि मशापा कोळी हे आदिवासी कोळी बांधव अन्नत्याग उपोषण करीत आहेत.
आज अन्नत्याग उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
आज सुरज खडाखडे आणि अभिमान घंटे या दोन उपोषण कर्त्यांची प्रकृती ढासळली असुन दोन्ही उपोषण कर्त्यांनी जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत उपचार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Leave a Reply