भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखान्याने गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा अधिक दर दिलेला आहे….
अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिलीलोकमंगल शुगर्सच्या तीन कारखान्यांपैकी भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉलअँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याने 2023-24 च्या गळीत हंगामापोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा 29.70 टक्के अधिक दर दिलेला असून तो प्रतिटन 621 रुपये जादा आहे असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
भंडारकवठे येथील या साखर कारखान्याने 2023-24 या गळीत हंगामात 4 लाख 3 हजार 66 टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांना एफआरपी दर 2094 रुपये प्रति टन असा देय होता पण कारखान्याने 2715 रुपये दर दिला. यातून शेतक-यांना एकूण 84 कोटी 40 लाख रुपये देणे सरकारी नियमानुसार अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात 109 कोटी 46 लाख रुपये देण्यात आले. ही जादा रक्कम 25 कोटी 6 लाख रुपयांनी जास्त आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली ही रक्कम नियमानुसार देणे असलेल्या रकमेपेक्षा 29.70 टक्क्यांनी जास्त आहे असे देशमुख यांनी सांगितले.
साखर कारखाना हा लगतच्या भागातले विकासाचे इंजिन असतो. कारखान्यात साखर तयार करून आम्ही परिसरात एक अब्ज रुपये अर्थकारणात आणले आणि विकासाला चालना दिली आहे. त्याचे परिणाम आपल्याला दिसत असतातच. 2023-24 चा हंगाम साखर कारखान्यासाठी अडचणीचा होता, कारण उसाची कमतरता होती. पण तरीही या परिसरातल्या शेतकऱ्यांनी या कारखान्यावरचा आपला विश्वास व्यक्त करून जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला दिला. शेतकरी आणि काखाना यांच्या संयुक्त प्रयत्नातून गाळप हंगाम यशस्वी झाल्याचे चेअरमन यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक पराग पाटील, प्रशांत पाटील, सर व्यवस्थापक अशोक शिंदे, शेती अधिकारी दीपक नलावडे आदी उपस्थित होते. तसंच याच दिवशी
गुरुवारी या लोकमंगल कारखान्याचे 2024 -25 रोलर पूजा करण्यात आले. यावेळी भंडारकोठाचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, यतीन शहा, जनरल मॅनेजर गजराज रुद्रमठ, गुणाणशेखरन, किशोर जोशी, दीपक नलवडे, विठ्ठल देशमुख, एम पदमराज, अखिल बिटे, इकबाल शेख, विवेक पवार, नंदकिशोर कदम, श्रीशैल लोखंडे, कपिल शिंदखेडे यांच्यासह अन्य मान्यवर, शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply