मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आमदारांनी मारल्या उड्या….

मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आमदारांनी मारल्या उड्या….

राज्याच्या राजकारणात खळबळजनक बातमी समोर आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल. ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे झिरवळ यांनी काही तासांपूर्वी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. या भयंकर प्रकाराने मंत्रालय हादरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी झिरवळ आंदोलन करत आहेत. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे झिरवळ यांनी म्हटले होते. त्या प्लॅन बी नुसार झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *