सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा

सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा

 

सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, अनेक वर्ष मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय, मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला. समस्या खूप व्यापक आहेत.
शहरी भागातील हद्दवाढ अनेक प्रश्न आहेत, शहरी भागात कुणी वाली नाही का?

इथले प्रश्न बघितले तर फार वाईट वाटले
बारामतीने जितकी पदे भूषविली ती सर्व सोलापूरने भूषविली, मग सोलापूरचा बारामती सारखा विकास का झाला नाही? आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले. माजी खासदारला घेऊन उद्घाटन केले, सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते?

म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत
मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, येणारी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असे सांगताना झोपलेल्या जनतेला तुतारी वाजवून किंवा सिलेंडर फोडून उठवू असेही ते म्हणाले. यावरून पवार हे वंचित बहुजन आघाडी कडून इच्छुक असल्याचे स्पष्ट होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *