जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्षचा दारुण पराभव,मुख्यमंत्री महेबूबा मुफ्तीच्या मुलीला अपयश…

जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्षचा दारुण पराभव,मुख्यमंत्री महेबूबा मुफ्तीच्या मुलीला अपयश…

हरियाणासोबतच झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज घोषित होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. तर, राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेल्या पीडीपीची पुरती वाताहत झाली आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची मुलगीही पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.
राष्ट्रपती राजवट लागू होण्याआधी मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी सोबत सत्तेत असलेल्या भाजपने या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत येण्याचा प्रयत्न चालवला होता. तो अपयशी ठरला असला तरी भाजपला चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, पीडीपीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
पीडीपीने माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना स्वत:चीही जागा राखता आलेली नाही. त्यांचा पक्ष अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहे. सहा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर सिरगुफवारा-बिजबेहरा मतदारसंघात इल्तिजा ४,३३४ मतांनी पिछाडीवर पडल्या. त्यामुळे त्यांनी पराभव मान्य केला आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *