सोलापूर मधील धक्कादायक घटना; एक जागीच ठार…
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ ते पंढरपूर या मार्गावर आज पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. टोल प्लाझावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा गुन्हा कैद झाला आहे. हे फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टोल नाक्यावर कर्मचारी उभे आहेत, इतक्यात एक ट्रक भरधाव वेगाने येतो आणि कर्मचाऱ्यांना धडक देतो.
त्यानंतर तो तिथून पलायन करतो. या घटनेत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या घटनेत पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरु आहे.
Leave a Reply