पानगल प्रशालेत सिरतुननबी कार्यक्रम संपन्न…

पानगल प्रशालेत सिरतुननबी कार्यक्रम संपन्न…


एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नईम शेख मेमोरियल हॉलमध्ये सिरतुननबी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रशालेच्या विद्यार्थ्याने भाग घेतला होता. मुलांनी सदर कार्यक्रमात किरात,हमद,नात व भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हारून रशीद बागबान होते. तर प्रमुख पाहुणे हाजी अययुब कुरेशी, नगरसेवक रियाज हुंडेकरी व रिजवान शेख होते अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पानगल प्रशालेत कुराण हिफज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व तसेच नात, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे पाहुण्यांचे हस्ते स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात दिनियात शिकवणारे शिक्षक मौलाना नाझीम, हाफिजा जवेरीया, अरशिया शेख, उजमा उस्ताद यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान याने आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात तारीक शेख व अकबर पठाण ने सूत्रसंचालन केले व पाहुण्यांचे आभार अब्दुल रऊफ पटेल याने मानले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसीन माशाळ, मेहमूद खतीब, सना आवटे व अल्ताफ सिद्दिकी यांनी परिश्रम घेतले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *