पत्नी विहीरीत पडली तीला वाचवताना पतीचाही मृत्यू….
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी येथील दुर्दैवी घटना; गावावर पसरली शोककळा
पत्नी शेतातील विहीरीत कपडे धुवायला गेली असता तिचे पाय घसरून ती विहीरीत पडली आणि कशाचाही विचार न करता तीला वाचवण्यासाठी तो विहीरीत उडी मारला मारला. मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने पत्नीसह पती सुध्दा विहीरीत बुडून मृत्यू पावल्याची घटना बाळगी येथे आज सोमवारी सकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे बाळगीसह परिसरात शोककळा पसरलेली आहे.
सुनीता उर्फे सावित्री संगप्पा कोळी वय ३१ व संगप्पा चंदप्पा कोळी वय ३८ दोघेही राहणार बाळगी असे विहीरीत बुडून मृत्यू पावलेल्या दुर्दैवी पतीपत्नींची नावे आहेत.
संगप्पा कोळी यांचे गट नंबर 177 हे गावाशेजारी शेत आहे.
याच शेतातील द्राक्षे या पिकाला औषधफवारणीचे काम सुरू होते. यावेळी पत्नी सुनीता उर्फे सावित्री सकाळी घरातील कपडे धुण्यासाठी शेतातील विहीरीत गेली. यावेळी कपडे धुत असताना अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. यावेळी जवळच द्राक्ष पिकाला औषधफवारणी करणार्या पती संगप्पा कोळी याला विहीरीत आरडाओरड ऐकू आल्याने तो विहीरीकडे गेला. यावेळी विहीरीत पत्नी पडल्याचे दिसले. तेंव्हा संगप्पा यांने कशाचाही विचार न करता विहीरीत पत्नीला वाचविण्यासाठी उडी मारला. यावेळी पत्नीला वाचविताना सुनीता उर्फे सावित्रीने पती संगप्पाच्या गळ्याला घट्ट मिट्टी मारली. पत्नीने मिठी मारताच संगप्पाला विहीरीत पोहोताच आले नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडून मृत्यू पावले. जवळच असणार्या संगप्पाच्या आईला आवाज येताच सर्वचजण विहीरीकडे धाव घेतले. मात्र तोपर्यंत पतीपत्नी दोघेही पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्यानंतर गावातील आप्पासाहेब भोई अस्लम शेख परमेश्वर कोळी म्हाळप्पा कोळी आणि महेश कोळी या पाच तरूणांच्या आणि ग्रामस्थ मंडळींचा सहाय्याने दोन्ही मृतदेह पाण्या बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतदेहांचे मंद्रुपच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून बाळगी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. संगप्पा कोळी हे बाळगी गावचे माजी सरपंच होते. त्यांच्या पश्चात मुलगी स्वेता, मुलगा सुमीत,आईवडील व भाऊ असा परीवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास मंद्रुप पोलिस करीत आहेत.
Leave a Reply