सलमान खानला पुन्हा मिळाली धमकी…

सलमान खानला पुन्हा मिळाली धमकी…

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. यातच आता पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यावेळी थेट वाहतूक नियंत्रण कक्षाला पाठवलेल्या मेसेजमध्ये धमकी दिली गेली आहे.
मेसेज करणाऱ्याने स्वतःला बिश्नोई गँगचा जवळचा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही धमकी बिश्नोई टोळीकडूनच दिली गेली असावी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या नव्या धमकीने खळबळ उडाली आहे. मागील आठवड्याच माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
आता मुंबई वाहतूक पोलिसांना एक धमकीवजा मेसेज मिळाला. यामध्ये बिश्नोईबरोबर सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपये मागण्यात आले. जर सलमानने पैसे दिले नाही तर बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था होईल, अशी धमकी देण्यात आली. हा मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्यात आला.
या मेसेजला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही देण्यात आला आहे. सलमानला बिश्नोई बरोबरचा वाद मिटवायचा असेल तर पाच कोटी रुपये द्यावे लागतील. जर नाही दिले तर सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था होईल, असा इशारा या मेसेजमध्ये देण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या धमकीची गांभीर्याने दखल घेतली आहे. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत सलमानचे कुटुंबिय प्रचंड धास्तावले आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *