सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘कर्मवीर आबासाहेब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….
शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार गणपत आबा देशमुख यांच्या जीवनावर चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.’कर्मवीर आबासाहेब’ असं या चित्रपटाच नाव आहे.तब्बल 11 वेळा आमदाराकी भूषविणाऱ्या गणपतरावं देशमुख यांच्या जीवनावर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे.मराठी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा नायक अनिकेत विश्वासराव हा गणपतराव देशमुख यांची भूमिका सकारत आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील जवळपास 50 नामवंत कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहेत.या चित्रपटाच बहुतांश शूटिंग हे सांगोला,पंढरपूर आणि मुंबई विधीमंडळात झालं आहे. अल्ताफ शेख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिल आहे.येत्या 25 ऑक्टोबरला जगभरात मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply