शहर मध्य मधून मुस्लिम समाजाचा निर्णय काय..?

शहर मध्य मधून मुस्लिम समाजाचा निर्णय काय..?

सोलापूर शहर व जिल्ह्यात विधिनसभा निवडणूकीला घेऊन एक ना अनेक प्रश्न सध्या तोडं वर काढत आहेत. त्या प्रशानाचा उत्तर कोण शोधणार. अश्यातच एक सामाजिक संघटनेचा चर्चेत आहे. निवडणुक असो किंवा मुस्लीम समाजातील समस्यांना उजागर करणारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तंजीमे हमदर्दे इन्सानियत या संघटनेचा सिंहाचा वाटा ठरला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आपली प्रकट बाजू मांडून तंजीमे हमदर्दे इन्सानियत संस्थेने ते सिध्द ही केले. तंजीमे हमदर्दे इन्सानियत संस्थेचा सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठा नेटवर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यात शिक्षितवर्गा सह डॉक्टर, वकील, स्टूडेंट्स, त्याच बरोबर राजकीय ज्ञान असणारे नेते मंडळीही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत तंजीमे हमदर्दे इन्सानियत संस्थेने सोलापूर शहर व जिल्ह्यातील मुस्लीम समाजा मार्गदर्शन करून संविधान वाचविण्यासाठीच कॉग्रेस पक्षाचे प्रणीती शिंदे यांना मतदान करण्याचे आवाहन कले. तंजीमे हमदर्दे इन्सानियत संस्थेतील पदाधिकाऱ्यांसह मुस्लीम समाजातील अनेक मान्यवरांनी तंजीमच्या अव्हानाला साध देत संविधानच्या हक्कासाठीच कॉग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून लोकसभेत प्रणीती शिदेंना खासदार बनवुन पाठवले. त्याच बरोबर सोलापूर शहर व जिल्ह्यातील उलमाचा देखील संविधान बचाव या नर्यात मुस्लीम समाज कूठेच मागे सरकला नाही. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अहले हदीस जमीयत, सुन्नी जमियत, तसेच उलमा असो की तंजीमे हमदर्दे इन्सानियत, यांची भुमिका विशेष करून निवडणुकीत मोठी घडामोडी व बदल घडवून आणणारी आहे. सध्यातरी शहरमध्य, उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघात मुस्लीम उमेदवाराची वर्णी कॉग्रेस पक्षाकडून लागली नाही. आणी ती लागणार नसल्याची कुणकुण ही मुस्लीम समाजातुन होत आहे. अश्यातच तंजीमे हमदर्दे इन्सानियत संस्था व उलमांची काय भुमीका असणार.? लोकसभेत ज्या प्रमाणे संविधान वाचविण्यासाढी वज्रमुढ झालेली तंजीमे इन्सानियत हमदर्द स॔स्था व उलमांची भुमीका विधानसभेतील शहर मध्य, उत्तर, व दक्षिण मधील उमेदवारीला घेऊन काय निर्णय घेतील, किंवा मुस्लीम समाजाला काय उपदेश करतील.
त्यातलाच एक भाग म्हणजे शहर मध्य मधून मुस्लिम उमेदवारांची कॉग्रेस पक्षाकडून इच्छूक म्हणून अनेकांची वर्णी लागली पण अध्याप मुस्लीम समाजाचा विचार करण्यात आला नाही. म्हणुन मुस्लीम समाजातील नेते मंडळी पुढे काय दिशा ठरवतील त्यातच राजकारणात आपला वलय निर्माण करणारी तंजीमे हमदर्द इन्सानियत व उलमा यांची काय भुमीका असणार. आम्ही लवकरच तंजीमे हमदर्द इन्सानियत च्या पदाधिकाऱ्यांसह उलमांची प्रतीकिया घेणार आहोत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *