श्री चैतन्य टेक्नो स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायतीने क्रीडा सप्ताहाची सांगता केली.
सोलापूर: दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी कै. सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर संचलित श्री चैतन्य टेक्नो स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कवायती सादर करून क्रीडा सप्ताहाची सांगता केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. पी. सौजन्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर विभागाचे क्रीडा प्रमुख सत्तेन जाधव उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या
डॉ. पी सौजन्या यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या सुंदर नृत्याने झाली. त्यानंतर इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडचे अप्रतिम सादरीकरण केले. तसेच इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी दांडिया नृत्याचे सादरीकरण केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान पदक व सन्मानपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतील त्यांचे अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व दिले पाहिजे. निरोगी आरोग्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे या शब्दात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या डॉ. पी. सौजन्या, शाखा अधिकारी रूपाली चौधरी व विस्तार अधिकारी आदिनारायण पडाल व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply