देगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक166 हायवेवर शहर पोलिसांची कडक नाकाबंदी..
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या सर्व दु व्हिलर चारचाकी वाहनांची कडक तपासणी करून सोलापूर शहरात प्रवेश दिले जात आहे.सोलापुर सांगली हायवे क्रमांक 166 या राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरानजीकच असलेल्या देगाव जवळील टोलनाक्याजवळ स्थिर संरक्षण पथकाची नेमणूक जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुन सोलापूर शहरात अवैध रित्या येणाऱ्या रोख रक्कम असेल किंवा अन्य वस्तू येऊ नये म्हणून आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आतापर्यंतच्या काळात सोलापूर शहराच्या आजूबाजूला असलेल्या सर्व मार्गी वर स्थिर संरक्षण पथकाची अर्थात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील टाकळी ब्रीज सादेपुर बंधारा,भंडारकवठा बंधारा हैदराबाद रोडवरील टहिटणे येथे अक्कलकोट रोडवरील अक्कलकोट नाका येथे बार्शी रोड वरील बार्शी टोलनाका मंगळवेढा रोडवरील देगाव टोलनाक्यावर आदी मार्गावर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि सोलापूर ग्रामीण पोलीस आणि शहर पोलिसांच्या वतीने कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात आलेल्या सर्व वाहनांची कसुन चौकशी केली जाते या मध्ये वाहनधारकाचे नाव चालकाचे नाव मोबाईल नंबर कोठुन कुठे पर्यंत प्रवास करणार असल्याचे माहिती स्थिर संरक्षण पथकाच्या रजिस्टर मध्ये नोंद करण्यात येत आहे.
Leave a Reply