राज्यात कुणाचं सरकार येणार? मनोज जरांगे पाटील यांचा अंदाज काय?

राज्यात कुणाचं सरकार येणार? मनोज जरांगे पाटील यांचा अंदाज काय?

Manoj Jarange Patil Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या कुणाचं सरकार येणार? कोणती आघाडी सत्तेत असणार? कोण मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. परवा दिवशी मतमोजणी होणार आहे. असं असताना कुणाचं सरकार राज्यात येणार? याबाबत तर्क लावले जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं. आम्ही मैदानात नव्हतो, त्यामुळे मी अंदाज सांगू शकत नाही. जर मी मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असता. राज्यातील कोणताही उमेदवार मराठ्याच्या मताशिवाय निवडून येऊ शकत नाही आणि हे अंतिम सत्य आहे. आता निवडणूक विषय संपलेला आहे. मराठ्यांनी राजकारण विषय हा डोक्यातून काढून टाकला आहे आणि आता आरक्षणाची लढाई सुरू होणार आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत. सरकार स्थापन की, आमरण उपोषण तारीख जाहीर करणार असं जरांगेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

उमेदवार कोणताही निवडून आला म्हणजे तो काही मालक झाला नाही, त्याला मराठ्यांनी निवडून दिले आहे. या निवडणुकीत फायदा कोणाचा होईल. मी निवडणुकीत नसल्याने कोणाचा फायदा किंवा कोणाचा ताटात तोटा होईल मला सांगता येणार नाही. मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे आता मराठे मला सांगणार आहेत. कोणत्याही उमेदवारांनी बेईमान होऊ नये. गद्दारी केली तर, तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

राज्याच्या वतीने आपण सामूहिक उपोषण लावले आहे, त्याची सर्वजणांनी तयारी करावी. उपोषणाची तारीख आपण सरकार स्थापन झाली की, घोषित करणार आहोत. गावात कुठेही आमरण उपोषण करायचं नाही, आमरण उपोषण आंतरवाली सराटीत करायचे आहे. आता शेवटची फाईट करून निर्णायक आंदोलन करायचे आहे आणि आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना मतदान केलं आहे. त्यांनी आता मराठ्यांच्या अडीअडचणीत उभे राहायचे आहे, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

मराठ्यांच्या मागण्या मांडणे, आंदोलनात सहभागी होणे. मराठ्यांच्या मतावर निवडून आला आणि राज्यांमध्ये वच वच केली. तर मराठे पुन्हा राज्यात फिरू देणार नाही. मराठ्यांची मत घेणारा मग तो, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असू दे. मराठ्याच्या मतावर निवडून आला आणि पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने बोलला, तर मराठे त्याचा दुमता काढतील. मराठ्यांनी त्याला मते दिले आहेत आणि म्हणून त्याला राज्यात फिरायची पंचायत होईल, असंही जरांगे म्हणालेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *