सोलापुरात निकालापूर्वीच झळकले विजयी अभिनंदनाचे बॅनर….
विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल उद्या दिनांक23 नोव्हेंबरजी लागणार आहेत. उद्याच्या निकाला वेळेस कोण बाजी मारणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोणता उमेदवार विजयी होईल हे देखील उद्याच कळणार आहे.
परंतु निकालापूर्वीच अक्कलकोट मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाल्याचे बॅनर पहावयास मिळाले. अक्कलकोट मतदार संघातील मुळेगाव या गावात अक्कलकोटचे भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे विजयी झाल्याचे तसेच अभिनंदन करणारे बॅनर निकालाच्या एक दिवसापूर्वीच लागले आहेत.
Leave a Reply