मेहकरमध्ये दोन गटात वाद, गाड्यांची जाळपोळ; 23 जणांना केली अटक
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला. या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणची वाहने पेटवून देण्यात आली यात त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आज मेहकरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी केले आहे.
Leave a Reply