मानसिक त्रासाला कंटाळून सोलापुरात विवाहित महिला गळफास घेऊन आत्महत्या…..
केल्याची घटना घडली थोडक्यात माहिती अशी की
फिर्यादी अहमद अब्दुल वालीकर यांची मुलगी आलिया हिचे लग्न 30 ऑक्टोबर 2022 रोजी जावेद कयूम शेख राहणार रामवाडी सोलापूर यांच्यासोबत झाला होता लग्नानंतर पाच सहा महिने सुखात संसार सुरू होता मात्र त्यानंतर नवरा जावेद शेख सासु रज्जू शेख ननंद रुबिना शेख या सर्वांनी मिळून तुझ्या वडिलांनी लग्नात आम्हाला काही दिलं नाही आमचा मानपान केला नाही म्हणून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली .. त्रास इतका विकोपाला गेला की आलिया हिने राहत्या घरातील लोखंडी खिडकीला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.. अशी फिर्याद मयत आलियाचे वडील अहमद यांनी सलगर वस्ती पोलीस चौकीत तक्रार केली आहे.. या तक्रारी वरून जावेद कयूम शेख रज्जो कयूम शेख रुबीना कयूम शेख सर्व राहणार रामवाडी यांच्यावर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.. या घटनेच्या पुढील तपास पोलीस करीत आहेत..
Leave a Reply