भांडुप मधील एका नामांकित इंग्लिश स्कुल मध्ये विनंयाभंगाची घटना…
शाळेमध्ये लिफ्टच्या कामासाठी आलेल्या कामगाराने भांडुप मधील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोपाल गौडा वय २७ असे या तरुणाचे नाव असून शाळेच्या बेसमेंट मध्ये तो लिफ्टचे मेंटेनन्सचे काम करत होता. त्यावेळी योगा करण्यासाठी दुपारी एक च्या दरम्यान तिथे पाचवी इयत्तेच्या मुली योगा क्लासेस साठी आल्या होत्या, त्यावेळी गोपाल याने या विद्यार्थिनींपैकी एकीच्या पाठीवरून हात फिरवला तसेच इतर मुलींसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या तिघी गोपालच्या वर्तनाने घाबरल्या आणि त्या तेथून स्वतःची सुटका करून पळून गेल्या. या विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार त्यांच्या शिक्षकांना सांगितला आणि तातडीने शाळेच्या प्रशासनाने गोपाल गवडा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. गोपाल याला दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.
Leave a Reply