ठाणे पोलिसांची धडक कारवाई: चेन स्नॅचिंग प्रकरण उघड, सराईत गुन्हेगार गजाआड….
ठाणे शहरातील कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर, आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग व दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा-3 कळवा यांनी महत्त्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव इम्रान इस्माइल अली उर्फ काले (32, रा. बदलापूर) आहे. आरोपीने महिलांचे सोन्याचे दागिने लुटण्याचे 40 हून अधिक गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून 4.08 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
तपासात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी, खडकपाडा, शिवाजीनगर, आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे.
ठाणे पोलिसांनी या गुन्ह्यांचा पर्दाफाश करत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी पंढाराबाई उगले आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी पार पाडली. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले असून, पुढील तपास सुरु आहे.
Leave a Reply