गोंदियाच्या शिवशाही बस अपघातात घोटी येथील सय्यद कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर दोघेजण जखमी……
गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बस अपघाताची दुर्दैवी घटना घडली या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 26 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले पालकत्व गमावले. गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सय्यद कुटुंब हे एका लग्नाकार्यासाठी साकोली येथे गेले होते. लग्न कार्य उरकून ते साकोली वरून शिवशाही बसचा प्रवास करीत आपल्या गोरेगाव घोटी या गावाकडे येण्यासाठी निघाले पण या अपघातामध्ये सय्यद कुटुंबातील कर्ता पुरुष आणि महिला अजगर अली सय्यद आणि आरेफा अजगर अली सय्यद या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच अपघातात मृतक अजगर अली यांचा एकुलता एक मुलगा व आई जखमी झाले आहेत. तर अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा अत्तर अली हा पोरका झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी आज सय्यद कुटुंबीयांना भेट देत त्यांचे सांत्वन केले.
Leave a Reply