महायुतीचा वाद विकोपाला,आमदार आमश्या पाडवी वर विनयभंगाचा गुन्हा दाखल…..
अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील महायुतीत मोठा वाद निर्माण होऊन विकोपाला गेला आहे. अक्कलकुवा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्याविरुद्ध महिलेने विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. आमदार आमश्या पाडवी, मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली. याबाबत पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आमदार पाडवी यांची मुलगी अंजू आमश्या पाडवी यांनी देखील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली.
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात राजकीय वाद पेटला आहे.शिवसेनेचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करत ती थेट अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहचली. सदर
पीडित महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. पीडित महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिता सदस्य आहे.पीडित महिलेने केलेल्या आरोपावरून आमदार आमश्या पाडवी , त्याचा मुलगा व कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आमदार आमश्या पाडवी यांची मुलगी अंजू पाडवी यांनी ही अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजपा नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष वळवी यासह पीडित महिला आणि तिच्या भावाच्य विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीत महायुपीत वाद निर्माण होऊन महायुतीचा उमेदवार आमश्या पाडवी यांचा विरोधात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षाच्या राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली होती. निवडणुका संपल्या परंतु महायुतीतील वाद अजून मिटला नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे….
Leave a Reply