मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिसांनी दबाव टाकणं चुकीचं आहे – असीम सरोदे…

मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिसांनी दबाव टाकणं चुकीचं आहे – असीम सरोदे…

सोलापूरच्या मारकडवाडीतील लोक मतदान आणि मतदान प्रक्रिया ईव्हिएमवर फार नाराज होते. त्यामुळे त्यांनी एक लोकशाहीचा मार्ग वापरला त्या्ंनी तहसीलदाराकडे तक्रार केली आम्हाला पुन्हा मतदान करायच आहे आणि पुन्हा मतमोजणी तुम्ही घ्या. परंतु तशा प्रकारची कोणतीही प्रक्रिया नसल्यामुळे त्यांनी तो अर्ज नामंजूर केलेला आहे आणि त्याला कंटाळून त्यांनी स्वत: लोकशाही प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं बॅलेट पेपर वर मतदान करायच. याच पार्श्वभुमीवर मारकडवाडी या गावामध्ये पोलीस जमलेले आहे 144 कलम लावलेला आहे. जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत पोलिसांनीच ग्रामस्थांवर आरोप केलेला आहे कि ते कायदा आणि सुव्यवस्थेवर आव्हान तयार करणार आहेत. माझं पोलिसांना आवाहन आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची अतिरेकी कारवाई गावकऱ्यांवर करु नये ग्रामस्थ लोकशाही मार्गाने शांततेने बॅलेट पेपर करुन स्वत: मतमोजणी करणार आहेत तर त्यांचा आता झालेल्या मतमोजणी वर कोणताही परिणाम होणार नाही परंतु लोकशाही मध्ये लोकांना असं मतदान करण्याचा हक्क आहे लोकसंख्येपेक्षा पोलीस तिथे जास्त जमलेले आहेत अशा प्रकारे पोलीसांनी नागरिकांवर दबाव आणणं चुकीचं आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *