लीफलेट नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावरती मंद्रूप पोलिसांची कारवाई.

लीफलेट नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावरती मंद्रूप पोलिसांची कारवाई.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील 38 गावच्या हद्दीतील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर, बैलगाडी छकडा असेल अशा फॅन्सी नंबर प्लेट लिपलेटर नसलेल्या वाहनावरती मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग जाधव आणि त्यांच्या पथकाच्या माध्यमातून वरील वाहनावरती दंडात्मक कारवाई केली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना,धोत्री येथील गोकुळ शुगर,आचेगावचे जय हिंद शुगर मिल,मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना,उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथील सिध्दनाथ साखर कारखाना, मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीलगत कर्नाटक राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणारे वाहने असुन हे वाहने मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ऊस वाहतूक करीत असतात परंतु ज्या वाहनांच्या पाठीमागे लिपलेटर मोठ्या आवाजात टेप लावणे फॅन्सी नंबर प्लेट वर‌ मंद्रुप पोलिस ठाण्याच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

3 नोव्हेंबर 2024 रोजी वळसंग जवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला माल ट्रक मागून धडक दिली होती त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती परंतु दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले होते.

त्याच अनुषंगाने असा एखादा छोटा मोठा अपघात होऊ नये याची खबरदारी म्हणून मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने लीफ लेटर त्यांची नंबर प्लेट आणि मोठा आवाजात टेप लाउन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे.

यावेळेस मंद्रूप पोलीस ठाण्याचे मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनल शी बोलताना म्हणाले की वरील अशा प्रकारे वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *