“बज्मे गालिबच्या आंतरशालेय उर्दू काव्य अंताक्षरी म्हणजेच बैत बाजी स्पर्धेत पानगल उर्दू प्रशालेस दुहेरी मुकुट”
दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूरची प्रसिद्ध व सुप्रसिद्ध साहित्यिक व शैक्षणिक संस्था “बज्मे गालिब सोलापूर’ तर्फे आंतरशालेय उर्दू बैत बाजी म्हणजेच उर्दू काव्य अंताक्षरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ असे दोन गट होते. या स्पर्धांमध्ये एकूण तेरा शाळांनी सहभाग घेतला होता.
या बैत बाजी च्या वरिष्ठ गट स्पर्धेत “एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल” च्या विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट कौशल्य दाखवून प्रथम पारितोषिक पटकावले आणि अंतिम बैत बाजी स्पर्धा जिंकली. या संघात मुहम्मद शिफा भांगिरे, हायका बागबान, दानिश बेलिफ व मुहम्मद युसुफ शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाच्या शैलीने आणि कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
शिवाय आंतरशालेय उर्दू बैत बाजीत ज्युनियर गटाच्या स्पर्धां मध्ये एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूलच्या संघाने आपले कर्तृत्व दाखवत अंतिम फेरी गाठली. या अंतिम फेरीत अली अन्सारी , असद बिराजदार , इरम भानगिरे व सिदरा खान या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने उर्दू कवितांचे सादरीकरण करून वाहवा मिळवली.
या दोन्ही पुरस्कार विजेत्या संघांनी आपल्या प्रशाले ची विजयी परंपरा सुरू ठेवल्या. या दोन संघांचे नेतृत्व व मार्ग दर्शन प्रशालेच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका शबाना शाहभाई आणि आलिया परवीन इनामदार यांनी केले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी खूप मेहनत घेतली. आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी
Leave a Reply