कुमठे येथे श्री राम नवमी ते हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

कुमठे येथे श्री राम नवमी ते हनुमान जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रभू श्री राम नवमी ते हनुमान जयंती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह या सप्तहाचे हे 44 वर्षे आहे.
या सप्ताहाची सुरुवात हरिभक्त परायण पांडुरंग महाराज माने त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या हस्ते कलश पुजन करुन या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली
या सप्तहाची सुरुवात 6 एप्रिल 2025 पासून सुरुवात झाली.
या सप्तहाचे सुरुवातीचे किर्तन सकाळी 10ते 12 वाजण्याच्या सुमारास हरिभक्त परायण युवा कीर्तनकार प्रदीप पांडुरंग माने यांच्या किर्तनरुपी सेवा संपन्न झाली.
6 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 यावेळेत सोलापूरचे हरिभक्त पारायण अभिमन्यू महाराज पाटील कोंडीकर यांचे कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली तसेच 7एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेस धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हरिभक्त परायण संभाजी महाराज मेहुणकर यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली त्याचे 8एप्रिल 2025 रोजी रात्री धाराशिव जिल्ह्यातील कानेगावचे हरिभक्त परायण वैभव महाराज कानेगावकर यांची8ते10या वेळेत कीर्तन रुपी सेवा संपन्न झाली.
9 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 ते 10 या वेळेत अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांची कीर्तन रुपीस सेवा संपन्न होणार आहे.
तसेच 10 एप्रिल 2025 रोजी पुणे येथील हरिभक्त परायण दयानंद महाराज भोसले यांची ही कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार असुन 11 एप्रिल 2025 रोजी रात्री 8ते 10 यावेळेस संत मानकोणी महाराज यांचे वंशज श्री हरिभक्त परायण डॉक्टर किरण बोधले यांची कीर्तन रुपी सेवा संपन्न होणार आहे तसेच 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जन्माचे कीर्तन कासेगाव चे हरिभक्त परायण शाम महाराज जोशी यांची कीर्तन रुपी सेवा पहाटे 5 ते 7यावेळी होणार असुन त्याच दिवशी रात्री 8ते 10 या वेळेस धाराशिव एकंबीकरचे हरिभक्त परायण गुरुवर्य काकासो महाराज पाटील यांची कीर्तन रुपी सेवा समाप्त होणार असुन 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10ते 12 या वेळेस हरिभक्त परायण ज्ञानेश्वर चंद्रशेखर पाटील महाराज दहिवलीकर यांची कीर्तन रुपी सेवेने सत्याहाची सांगता होणार आहे.
मंगळवार 8 एप्रिल 2025 रोजी रात्री झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कानेगावचे हरिभक्त परायण वैभव महाराज कानेगावकर यांच्या कीर्तन रुपीस सेवेने संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला होते.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर गायलेल्या पोवाड्यामुळे संपूर्ण सप्ताहा मध्ये नव चैतन्य निर्माण झाले होते.
सुरू असलेल्या सप्ताहाच्या ठिकाणी सात दिवस सकाळ दुपार संध्याकाळ असे मिळून अन्नदात्यांनी चहा नाश्ता जेवण स्वरुपात महाप्रसादांचे वाटप केले.
हा संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी माऊली भजनी मंडळ कुमठे सोलापूर त्याचबरोबर समस्त कुमठे ग्रामस्थ मंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *