सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहिर.

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहिर.

सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने आज नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी जाहिर करण्यात आली.
सात रस्ता येथील सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील बस डेपो येथे पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील चालक आनंद आठवले यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
तसेच कायम वाहक लक्ष्मण जाधव यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नुतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भांडार अधिक्षक सुदर्शन करजगीकर तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्मशाळा परिवेक्षक ताजोद्दीन बेदरेकर यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे नावे पुढीलप्रमाणे
सेक्रेटरी रमेश आवताडे खजिनदार ज्ञानेश्वर ठोकळे सल्लागार पदी सुरेश नवगिरे राजाभाऊ गायकवाड, सदस्यपदी कामगार नेते देविदास गायकवाड समाधान आबुटे,जिलानी हिप्परगी,नरसु शिंदे आण्णासाहेब शिंदे खाजप्पा गजधाने, नागनाथ क्षीरसागर, प्रविण शिंदे, अस्लम शेख, सुजाता बिराजदार, दिपाली व्हनचेंगे, वरील पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत बिनविरोध निवडी झाल्या.
यावेळेस परिवहन उपक्रमातील प्रभारी कर्मशाळा परिवेक्षक ताजोद्दीन बेदरेकर, भांडार अधिक्षक सुदर्शन करजगीकर यांच्यासह, अनिल बागले कामगार नेते देविदास गायकवाड लक्ष्मण बंडगर, मारुती शिरसीकर,प्रकाश शिंदे,जिलानी हिप्परगी, शहाजी भोजने, राजु साखरे माधव कुलकर्णी गौरीशंकर म्हमाणे अंकुश बोराडे रमेश नडीमेटला,यांच्यासह परिवहन उपक्रमातील आजी माजी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिल बागले यांनी मांडले
नारायण घंटे लोकप्रधान न्युज सोलापूर

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *