उळे उपक्रेंद येथील 102आणि108 इमर्जन्सी ॲम्बुलन्सचा कारभाराचा सावळा गोंधळ आला समोर…

उळे उपक्रेंद येथील 102आणि108 इमर्जन्सी ॲम्बुलन्सचा कारभाराचा सावळा गोंधळ आला समोर…

 

उळे उपक्रेंदा तुन गर्भवती महिलेस प्रसुती साठी प्रायव्हेट ऑटो रिक्षांने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले गर्भवती महिलेच्या नातेवाईकातुन संताप व्यक्त..

बुधवार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील घटना आहे.
उळे येथील सुलोचना चौगुले या गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी उळे येथील उपकेंद्रात रात्री 9वाजता दाखल करण्यात आले होते.
सदर गर्भवती महिला ही रात्री1/30 वाजले तरी ही प्रसूती होत नसल्यामुळे आणि त्या गर्भवती महिलेची स्थिती क्रिटिकल असल्यामुळे उळे उपकेंद्राच्या आशा वर्कर यांनी रात्री 1वाजल्यापासुन 102 व 108 या इमर्जन्सी ॲम्बुलन्स ला फोन करत होत्या तर पण त्या दोन्ही ॲम्बुलन्स कडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.
अशातच उळे उपकेंद्राच्या आशा वर्कर यांनी रात्री 1/10मिनीटांनी प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष महमद पठाण यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला वरील परिस्थिती माहिती दिली
पुढील काही मिनिटांतच प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष रुग्णसेवक महमद पठाण हे उळे येथील उपक्रेंदात दाखल झाले.
तेथील परिस्थितीची गांभीर्य ओळखून लगेच प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष रुग्णसेवक महमद पठाण यांनी मोबाईल द्वारे 102आणि 108 या इमर्जन्सी ॲम्बुलन्स शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु 108 वाल्याकडून एक तास वेळ लागेल असे असे सांगण्यात आले.
सदर गर्भवती महिलेची परिस्थिती अतिशय क्रिटिकल होत चालली होती अशातच मध्य रात्रीची वेळ असल्यामुळे 108 आणि 102 इमर्जन्सी ॲम्बुलन्स झाल्यामुळे प्रहार सोलापूर जिल्हा वैद्यकीय मदत कक्षेचे अध्यक्ष रुग्णसेवक महंमद पठाण यांनी उळे उपकेंद्राच्या आशा वर्कर यांच्या मदतीने सदर गर्भवती महिलेस पुढील उपचारासाठी सोलापूर सिविल या ठिकाणी दाखल करण्यासाठी पर्याय नसल्यामुळे ऑटो रिक्षा या प्रायव्हेट वाहनाचा सहारा घ्यावा लागला.
शासनाने 108 आणि 102 या इमर्जन्सी ॲम्बुलन्स सोय केली आहे परंतु ते वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्यातून रोष निर्माण होत आहे.
102 आणि 108 या इमर्जन्सी अंबुलन्स वरती नेमकं आरोग्य विभाग किंवा जिल्हा प्रशासन कारवाई करणार की पाठीशी घालणार याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचा आहे.

नारायण घंटे लोकप्रधान न्युज उळे

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *