नामवंत वकिलांच्या स्मृती युवा वकिलांना मार्गदर्शक,स्पर्धेमुळे खिलाडूवृत्तीत वाढ – सुशीलकुमार शिंदे

नामवंत वकिलांच्या स्मृती युवा वकिलांना मार्गदर्शक,स्पर्धेमुळे खिलाडूवृत्तीत वाढ
– सुशीलकुमार शिंदे


रंगभवन येथे माजी जिल्हा सरकारी वकील श्री.संतोष न्हावकर यांच्या संकल्पनेतून विधीगंध संस्था व सोलापूर बार असोसिएशन कडून आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट चषक उदघाटन व नामवंत विधिज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार सोहळा पार पडला. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत असताना नामवंत विधीज्ञाच्या स्मृती जागविल्याने युवा पिढीला प्रेरणा मिळते.वकीलानी क्रिकेट मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, वकील सहसा खेळामध्ये भाग घेत नाहीत , कनिष्ठ वकील व जेष्ठ वकील त्या निमित्ताने एकत्र येऊन खेळल्याने दोघां मध्ये खेळ भावना येण्यास मदत होते असे प्रतिपादन श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

विधीगंध चषक मध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघ मिळून एकूण 20 संघ सहभागी झालेले आहे.
या प्रसंगी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन व विधीगंध पुरस्काराचे आयोजन करणेत आलेले होते.
याप्रसंगी
कै . तात्यासाहेब नेर्लेकर स्मृती विधीगंध पुरस्कार हा ॲड वसंतराव भादुले पंढरपूर यानां त्यांनी आपल्या वकीलपदाच्या कार्यकाळात दिवाणी व फौजदारी क्षेत्रात भूमिका निभावल्या बद्दल देण्यात आला. तर कै ए. तू. माने यांच्या स्मृती प्रित्यर्थ विधीगंध पुरस्कार डी एन काळे माळशिरस यांना देण्यात आला. तर कै. ए. डी. ठोकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ऍड.बापू करंजकर यांना आपल्या वकिलीत केलेल्या अतुलनीय कार्या बद्दल पुरस्कार श्री.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.तसेच नूतन न्यायाधीश अनिता हवालदार व जेलर तसेच सर्व तालुका बारचे अध्यक्षांचा सत्कार मा. सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.

नविन पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ यांचा पुरस्कार सोहळा व खेळातून खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असे प्रतिपादन अँड. संतोष न्हावकर यांनी केले तसेच त्यांनी कै. अशोक ठोकडे व कै. तात्यासाहेब नेर्लेकर यांच्या विविध आठवणी सांगून स्मृती जागवल्या.
याप्रसंगी क्रिकेट स्पर्धेच्या टी शर्ट चे अनावरण करणेत आले व सुशीलकुमार शिंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पहिल्या सामन्याचा टॉस करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघास कै ॲड व्ही.डी फताटे iयांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेता चषक देण्यात येणार असून, उपविजेता संघास कै ॲड जयकुमार काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उपविजेता चषक, तसेच मॅन ऑफ द सिरीज चषक कै ॲड आर. जी. देशपांडे यांचे स्मृती पित्यर्थ व बेस्ट बॅट्समन चषक कै ॲड जी. एस. आडम यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे तसेच उक्रूस्ट गोलंदाज चषक कै.ॲड रमेश कनबसकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रदान करण्यात येणार आहे.

या प्रसंगी व्यासपीठावर विधीगंध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्री. संतोष न्हावकर, श्री.सुशीलकुमार शिंदे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्री. वी पी शिंदे, जेष्ठ वकील धनंजय उर्फ आबासाहेब माने, झहीर सगरी,मनोज पामुल, निदा सैफन, विनय कटारे हे उपस्थित होते सोबतच संपूर्ण जिल्हा तुन आलेले वकील खेळाडू, जेष्ठ व कनिष्ठ वकील बंधू भगिनी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा गव्हाणे यांनी तर आभार ऍड. मंजुनाथ ककलमेली यांनी मानले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *