डॉ.झोंबाडे यांच्या “अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य : एक चिंतन” पुस्तकास राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार

डॉ.झोंबाडे यांच्या “अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य : एक चिंतन” पुस्तकास राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार

बार्शी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर १०४ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ मनीषा झोंबाडे यांनी संपादित केलेल्या “अण्णा भाऊ साठे समग्र साहित्य : एक चिंतन” ह्या पुस्तकास मातंग साहित्य परिषदे पुणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार रविवारी दि. 13 एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय विचार साधना सभागृहामध्ये नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचे विभागीय अध्यक्ष न्यायाधीश सुनील वेदपाठक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पदमश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी माजी सामाजिक व न्याय मंत्री दिलीप कांबळे तसेच आमदार अमितजी गोरखे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मुकुंद कुलकर्णी, श्यामा घोणसे, प्रा. डॉ. धनंजय भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मनीषा झोंबाडे यांनी संपादनाचे उत्कृष्ट कार्य केले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या ग्रंथाचे कौतुक केले. प्रा.डॉ. मारोती कसाब यांची पुस्तकास प्रस्तावना लाभली. प्रकाशन सतीश झोंबाडे सिद्धी प्रकाशन, पुणे यांनी केले.
त्यांच्या या यशाबद्दल आमदार अमित गोरखे तसेच माजी मंत्री दिलीपराव कांबळे, ऍड. विजय पाटील, अमर मोरे,प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे, प्राचार्य डॉ. महेश बेटकर, प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, , प्रा. डॉ. विजय कुमठेकर, प्रा. डॉ. दत्तात्रय मुंढे व डॉ. प्रवीण मस्तुद इत्यादीनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *