व्हॉल्वो बसला भर दूपारी लागली आग
पुण्यात व्हॉल्वो बसला आज भरदुपारी भीषण आग लागली. पुणे सातारा रस्त्यावर ससेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलावर आज दुपारी एका प्रवासी वाहतूक कारणाऱ्या खासगी बसने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे कारण समजले नाही, मात्र आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सदर प्रवासी वाहतूक करणारी ही व्हॉल्वो खासगी बस साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने निघाली होती. दुपारी ससेवाडी फाट्यावर मायक्रो कंपनी समोरील उड्डाणपुलावर ही बस आली. यावेळी चालकाला बसच्या मागील भागाला आग लागल्याचे आरशात दिसले. ते पाहून बस बाजूला थांबवून तत्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या. या आगीत कोणालाही ईजा अथवा दुखापत झाली नाही. आग लागण्याचे कारण समजले नाही.
मात्र आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले. काही वेळातच संपूर्ण बस या आगीत जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतुकीचे नियंत्रण केले.
Leave a Reply