कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा पोरगा IPS झाला !
आय पी एस झालेल्या मेंढपाळाच्या मुलाचे नाव बिरदेव ढोणे असे असुन कुटुंबातील परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आई-वडिलांसमवेत दररोज एक गाव आपल्या घरातील मेंढ्यांना चारण्यासाठी तो नेहमी आई-वडिलांसमवेत जात असत.
मेंढ्या पालन करीत असताना मिळालेल्या फावल्या वेळेत तो जिद्दीने अभ्यास करत असत. राहण्यासाठी घर ही व्यवस्थित नव्हते असातच दोन खोलीच्या घरात जागा नसल्याने व्हरांड्यात अभ्यास करायचा, जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा.
निकाल आला त्यावेळी बिरदेव शेळ्या चारत होता. आईवडीलांच्या जीवनाचं सोनं केलं व एमपीएससी यूपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयपीएस बिरदेव यांच्याकडून प्रेरणा मिळेल..
Leave a Reply