Solapur : झोपलेल्या रेल्वे प्रवाशाचा नऊ लाखांचा ऐवज लंपास; नागरकोईल एक्स्प्रेसमधील घटना, नेमकं काय घडलं..

Solapur : झोपलेल्या रेल्वे प्रवाशाचा नऊ लाखांचा ऐवज लंपास; नागरकोईल एक्स्प्रेसमधील घटना, नेमकं काय घडलं..

कुडुवाडी : रेल्वे प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत चोरट्याने रोख रकमेसह नऊ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केली. ही घटना ता. १० रोजी रात्री दोन ते सव्वातीनच्या दरम्यान नागरकोईल एक्स्प्रेसमध्ये घडली.
ईश्वर गोविंद चेटीया (रा. अंबरनाथ, ठाणे) यांनी दौंड रेल्वे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा उशिराने कुर्डुवाडी रेल्वे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी, त्यांची पत्नी, मुली हे सर्व कुटुंबीय कल्याणहून त्यांच्या मूळगावी तिरपतूरला या गाडीच्या (क्रमांक १६३३९) ए १ बोगीतून प्रवास करत होते. पुणे रेल्वे स्थानक गेल्यानंतर सर्वजण बर्थवर झोपले. रात्री दोन ते सव्वातीनच्या दरम्यान चोरट्याने फिर्यादीच्या मुलीचा टेबलवर ठेवलेला मोबाईल व पर्स चोरून नेली..
यामध्ये रोख २५ हजार रुपये, ७२ हजार रुपये किमतीचा मोबाईल, २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे बांगड्याचे जोड, तीन लाख ५५ हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनाची चेन, ३० हजार रुपये किमतीचा कानातील सेट, ४ हजार रुपये किमतीचे तीन जोडवे, एक लाख ६० हजार रुपयांचे २० ग्रॅम वजनाचे बांगड्याचे जोड, ३ हजार ५०० रुपयांचे घड्याळ व इतर असा नऊ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीस गेला.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *