आ. सुभाष देशमुख यांच्या दीड वर्षांच्या पाठपुराव्याला यश,आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार

आ. सुभाष देशमुख यांच्या दीड वर्षांच्या पाठपुराव्याला यश , आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार
महापालिकेची पाईपलाईन स्थलांतरित न करता होणार पूल

आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाले आहे आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे. काम दर्जेदार करा आणि लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या.
आसरा समांतर उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 2023 मध्ये 32 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या पुलाचे काम करताना महापालिकेच्या जलवाहिनीचा अडथळा येणार होता. ती जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी तब्बल दहा ते बारा कोटींची आवश्यकता होती. मात्र पैसे नाहीत म्हणून महापालिकेने हे काम करण्यास नकार दिला. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही हात वर केले होते.आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य शासनाकडून हे 12 कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता मात्र येथेही विलंब झाला. त्यामुळे हे आसरा पुलाचे काम रखडले होते. मात्र त्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी पाईपलाईन स्थलांतरित न करता पूल कसा करता येईल याबाबत रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी , नॅशनल हायवे यांच्यासह अनेकांच्या बैठका घेतल्या. त्यासाठी एक समितीही स्थापन केली. त्यानुसार महापालिकेची पाईपलाईन स्थलांतरित न करता हा पूल कसा करता येईल याचा प्लान तयार केला. याच दरम्यान त्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली. यासाठी संपूर्ण दीड वर्षांचा कालावधी गेला. यादरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी महा रेल, रेल्वे अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा सल्लाही घेतला. महापालिकेची पाईपलाईन हस्तांतर न करता पूल बांधण्याचा प्लान तयार झाल्यावर आमदार सुभाष देशमुख यांनी भूमिपूजन करतो मात्र कामाला लगेच सुरुवात करावी अशी अट ठेवली. ती अट अधिकारी आणि ठेकेदारांनी मान्य केल्यानंतर अखेर अक्षय तृतीया मुहूर्तावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या पुलाचा या पुलाचे भूमिपूजन पार पडले. येत्या वर्षभराच्या कालावधीत हा पूल पूर्ण होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाराव गायकवाड, महावितरणचे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर प्रदीप मोरे, मोहन अलाट,
महारेल चे मनीष गांजारे, पीपी इन्फ्रा चे रोहन पाटील, विशाल गायकवाड, नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, मनीषा हुच्चे श्रीशैल स्वामी संकेत किल्लेदार महेश देवकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
चौकट
मुदतीच्या आधी काम केले तर आनंदच
भूमिपूजन कार्यक्रमानंतर ठेकेदारांनी आमदार सुभाष देशमुख यांना काम कसे होईल याची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी काम चांगले आणि दर्जेदार करा याशिवाय लवकरात लवकर करा अशा सक्त सूचना दिल्या. दिलेल्या मुदतीच्याआधी काम पूर्ण केले तर आनंदच होईल असेही आमदार सुभाष देशमुख म्हणाले

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *