प्रसिद्ध उर्दू कवी आणि लेखक आसिफ इक्बाल यांना पुअहो सोलापूर विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान
सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे संशोधक, प्रसिद्ध कवी आणि सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल अब्दुस सत्तार शेख यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. गौस अहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी “बालसाहित्याच्या प्रचार आणि प्रसारात गुलबुटे मासिकाच्या योगदानाचा अभ्यास” या विषयावर आपला शोधनिबंध पूर्ण केला.
आज सोलापूर विद्यापीठात मानव विद्या विभागाचे अध्यक्ष डॉ. वसंत कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पीएचडी “व्हायवा” आयोजित करण्यात आला होता. डॉ. सरदार पाशा हे बाह्य परिक्षक म्हणून उपस्थित होते.
संशोधन मार्गदर्शक डॉ. गौस अहमद शेख यांनी प्रास्ताविक करताना या संशोधन प्रकल्पाचे महत्व नमूद करताना, उर्दूतील बाल साहित्यावरील संशोधनाची गरज व्यक्त केली.
संशोधन अभ्यासक आसिफ इक्बाल यांनी त्यांच्या संशोधन विषयासंदर्भात सविस्तर मांडणी केली. आणि सर्व पाहुण्यांना आणि तज्ञांच्या प्रश्नांना तर्कशुद्ध उत्तरे दिली. परिक्षक डॉ. सरदार पाशा यांनी आपले निरिक्षण नोंदवताना सांगितले की, “आसिफ इक्बाल यांचा शोधनिबंधास अकादमिक आणि सांस्कृतिक मुल्य आहे. हे शोधनिबंध पुस्तकरुपात प्रकाशित झाला पाहिजे.” अध्यक्ष डॉ. वसंत कोरे यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी जाहीर करताना संशोधन विषयाचे कौतुक केले, अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी आसिफ इक्बाल यांनी कुलगुरू डॉ प्रकाश म्हानवर, डॉ. दायमा व इतर सहकार्याचे आभार मानले. इतिहास अभ्यासक सरफराज अहमद, प्राध्यापिका आयेशा पठाण, मुश्ताक गदवाल, शेख मोईज अहमद, इरफान पटेल, आकीद शेख, निखत शेख, तस्किन कलबुर्गी, रेहाना शेख, कुदसिया मनियार, शबाना काझी, रिजवाना प्यारे, फबिहा मुंडेवाडी, जुबेर शेख, सीए. मौलाना शेख,डॉ. इक्बाल धोटेघर, प्रोफेसर तस्लीम वड्डू, एजाज मंजूर आलम, अल्ताफ कुडले, सय्यद शाह वाईज, अली हसन, अब्दुल्ला शेख, अब्दुर रहमान शेख, सफा शेख आदी उपस्थित होते. या यशाबद्दल सोशल काॅलेज संशोधन केंद्र तर्फे सत्कार करुन प्राचार्य डॉ इ. जा. तांबोळी, डॉ. जैनोद्दीन मुल्ला, डॉ. आस्मा खान, जैनोद्दीन पटेल यांनी शुभेच्छा दिल्या…
Leave a Reply