दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापुर शिरवळ येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती…
निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.श्री मल्लिकार्जुन मंदिरात या शिबिराचे उद्घघाटन परमपूज्य श्री सोमलिंग महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये गावातील सर्वच समाजातील युवकांनी रक्तदान काळाची गरज ओळखून उत्साहाने सहभागी होउन उत्स्फूर्तपणे रक्तदान करून 50 जणांनी सहभाग नोंदवला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Leave a Reply