विंचूर जि.प.प्रा.शाळेत “उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन”संपन्न झाले.
दक्षिण सोलापूर—जिल्हा परीषद प्राथमिक शाळा विंचूर येथे आज दि.२/५/२०२५रोजी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंचूर गावचे सरपंच बाळासाहेब पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तारअधिकारी गुरूबाळा सनके साहेब , आयुब कलबुर्गी साहेब, रमेश घंटेनवरू ,संतोष मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे व खो खो मैदानाचे पुजन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राज्यस्तरीय खेळाडू समर्थ सोनगी , जैद शेख व शिबीरास सहकार्य करणारे पालक ,महादेव साबळे, शांतप्पा कोळी,दिपक घाडगे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी बोलताना गुरूबाळा सनके साहेबांनी विंचूर शाळेची क्रीडा क्षेञातील कामगीरी कौतुकस्पद असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक बसवराज बनपुरे,पंचाक्षरी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक लिगाडे,पोलिस पाटील मल्लीकार्जुन झाडबुके,प्रभाकर बाराजदार,सुरेश मलाबदे,महादेव कोळी ,दिपक घाडगे,यल्लप्पा कोळी, विजयकुमार बिराजदार,महेश माने ,विकास पवार, भिमाशंकर सोनगी,सुरेश म्हेञे,गिरीष साबळे,अप्पासाहेब कोटे,अप्पासाहेब कोष्टी,नागेश फुलारी ,खंडप्पा पाटील दशरथ कोळी ,अशोक साळुंके, सुनंदा जमादार,मीना नळे,व ग्रामस्थ बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन क्रिडामार्गदर्शक शिक्षक तुळशीराम शेतसंदी यांनी केले व आभार प्रदर्शन शांतप्पा कोळी यांनी मानले.
Leave a Reply