ॲब्यूलेन्स मध्ये तलवारी, ड्रायव्हर नशेत, पत्रकाराचा जिव मारण्याचा कट.

ॲब्यूलेन्स मध्ये तलवारी, ड्रायव्हर नशेत, पत्रकाराचा जिव मारण्याचा कट.

सोलापूर पुणे महामार्गावरील इंदापूर येथे संताप जनक घटना उघडकीस आली आहे ती म्हणजे एक दोन नव्हे तर चक्क तीन ॲब्लूलेन्स गाड्यात तलवारी आढळून आल्या. ॲब्लूलेन्स म्हणजे एखाद्या रूग्णाला वेळेवर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी किंवा जखमींना रुग्णालयात दाखल करून लागलीच उपचार मिळावा या साठी वापरात आणतात पण इंदापूर येथे अजीब प्रकार समोर आला ते म्हणजे ॲबुलेन्स मध्ये चक्क तलवारीची तस्करी.
यात हकीकत अशी की इंदापूर रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर तिन ॲब्यूलेनस उभ्या होत्या तिनही ड्रायव्हर नशेत तुल्ल होती. तेवढ्यात एक जबाबदार पत्रकार पेट्रोल भरण्यासाठी त्या पंपावर आला. पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांने ॲब्यूलेन्स मध्ये तलवारी आहेत व तिनी ॲब्यूलेन्सचे चालक दारूच्या नशेत आहेत. ही बाब समजताच जागरूक पात्रकार अतुल सोनकांबळे हे ॲब्यूलेन्स चे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली व चालकांना विचारणा केली पण तिन्ही चालकांनी पत्रकार अतुल सोनकांबळे यांना बेदम मारहाण करून अंगावर गाडी घालून जिवे मारणाचा प्रयत्न केला. तेवढ्यात तलवारी घेऊन तिसरी ॲब्यलेन्स पसार झाली. नेमक ही तलवारी कोणाचे होते. कुठून आणल्या होत्या. खाजगी ॲब्यूलेन्स कोणाच्या मालकीचे आहेत. हे अद्याप उघड झालेला नसुन पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी या घटनेची रितसर तक्रार दाखल केली असून पोलीस प्रशासन या घ्टनेची गांभीर्य ओळखून काय कारवाई करतील हे पाहणे तितकच गरजेचे आहे. खाजगी ॲब्यूलेन्स मधून तलवारी कोणाच्या आदेशाने तस्कर होत होती. या पार्श्वभूमीवर नेमक काय ॲक्शन पोलीस घेणार हे ही महत्वाचा ठरणार आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *