सोलापूरः जुना तुळजापूर नाका येथे एसटी पेटली
तुळजापूर वरून सोलापूरला येत असलेल्या एसटीने सोलापुरातील जुना तुळजापूर नाका येथे आल्यानंतर आज दुपारी अचानक पेट घेतला. यानंतर अग्निशामक दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून ही आग विझवली. एसटीमधून 42 प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्यानंतर ते सर्व लगेचच खाली उतरल्याने बचावले. तुळजापूर डेपोची ही एसटी होती. एसटी चालकाची केबिन पूर्णपणे जळाली आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.
Leave a Reply