सोलापूर शहरात बोगस नळ कनेक्शन
सोलापूर मनपा वर्षाची पाणीपट्टी वसुली करते पण त्या मागे बोगस नळ कनेक्शनचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असल्याचा एक खळबळजनक माहीती एका सुज्ञान नागरीकाने एका विडीओच्या माध्यमातुन मांडला आहे. सोलापूर शहरातील मोठी लोकवस्ती असणारा भाग म्हणजेच नई जिंदगी अमन चौकातुन अंत्रोळीकर नगरचा रस्ता. ह्या रस्त्यावर रात्रीच खेळ चालत असुन तसा विडीओ देखील एका सुज्ञान नाकरीकाने लोकप्रधान न्यूज नेटवर्कला पाठवलं. आठवड्यातून एकदा पाणीपवरठा या भागाला होतो पण लाखोलिटर पाणी रस्त्यावर वाहुन थेट अंत्रोळीकर नगराच्या दिसेन वाहतोय व या भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. ह्या विडीओ मधून रात्रीच्या सुमारास अवैध पद्धतीने खाजगी कामगार बोगस नळ कनेक्शन जोडणी करताना दिसुन येत आहेत. पण काही मनपा कर्मचारी चिरीमीरी घेऊन तर हा प्रकार करण्यास प्रोत्साहन देत नसतील ना असा प्रश्न निर्माण होत आहे. मनपा कर्मचारी नळ कनेक्शन जोडणी ही दिवसाच करतात पण रात्रीच्या 10 वाजल्या नंतर हा प्रकार बोगस नळ कनेक्शन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.अश्या बोगस नळ कनेक्शन मुळे अंत्रोळीकर नगरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असून या भागातील नागरिक त्रस्त आहेत.
मनपा अधिकारी अता काय कारवाई हे ही पाहण गरजेचा आहे.
Leave a Reply