सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन च्या वतीने ०२ मे ते ०८ मे २०२५ या कालावधीत आडवांस कोचिंग कॅम्प
होम मैदान व सेलिब्रेशन स्पोर्ट अकॅडमी सिंधू विहार विजापूर रोड सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला होता. या शिबिरासाठी भारताची पहिली फीबा इन्स्ट्रक्चर व भारतीय महिला कोच अर्निका गुजर मॅडम यांचा मार्गदर्शन लाभला .दि.०८/०५/२०२५ रोजी सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकॅडमी सिंधू विहार विजापूर रोड सोलापूर येथे या कॅमचा समारोप समारंभ झाला या समारोप समारंभाच्या अध्यक्षा सोलापूरचे लोकप्रिय खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न झाला. खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी आपले विचार मांडत असताना सांगितले की पुरुष व महिला पालक मंडळी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. माननीय खासदार प्रणिती ताईंनी असा संदेश दिला की मुलींना बास्केटबॉल खेळण्यासाठी अवश्य पाठवा. या खेळामुळे मुलींमध्ये सहकार्याची भावना खेळाडू वृत्ती निर्माण होते. खेळाडूंना उद्देशून बोलताना खासदार प्रणिती ताई म्हणाल्या दररोज असाच सराव चालू ठेवा येणारा अनेक स्पर्धेमध्ये राज्य नॅशनल तुम्ही या गुजर मॅडम यांनी शिकवलेल्या नवीन तंत्रांचा मॅन टू मॅन डिफेन्स, शूटिंग ट्रिब्लिंग उपयोग करून खेळामध्ये यश संपादन करा. सात दिवसात कौशल्य आत्मसात करण्याचे प्रयत्न केले आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. खेळाडू व प्रशिक्षकांचा मी अभिनंदन करते. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपल्या सोलापूर जिल्ह्यात बास्केटबॉल कॅम्प साठी भारताची पहिली आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल कोच अर्निका गुजर मॅडम आले व खेळाडूंना मार्गदर्शन केले दर वर्षी असाच कॅम्प घेऊ व सोलापूर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशने एवढा चांगला कॅम्पचा आयोजन केला खेळाडूंची व्यवस्था केली यासाठी असोसिएशनचे व अर्निका गुजर मॅडम यांचे आभार मानले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेंद्र काटिकर, प्रार्थना बिजंर्गी, अभिजीत टाकळीकर, मुजाहिद पिरजादे, तस्लिमा शेख सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय के.डी पाटील सर सचिव माननीय साकिब शेख सर खजिनदार माननीय दिनेश सारंगी सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हि बातमी आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावी हि नम्र विनंती.
Leave a Reply