कर्नल सोफिया कुरेशी यांचं मराठी कनेक्शन, 2015 मध्ये प्रेमविवाह, पतीही कर्नल !

कर्नल सोफिया कुरेशी यांचं मराठी कनेक्शन, 2015 मध्ये प्रेमविवाह, पतीही कर्नल !

ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofiya Qureshi) या बेळगावच्या सूनबाई आहेत. त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हेदेखीत भारतील लष्करामध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत.
भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईची जगाला माहिती देण्यासाठी दोन रणरागिणी समोर आल्या. एक म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंह. त्यापैकी कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सूनबाई आहेत. Sofiya Qureshi Love Story: गुजरातच्या सोफिया यांचा प्रेमविवाह
कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी (Colonel Tajuddin Bagewadi) हे मूळचे बेळगावातील गोकाक (Belgaum Gokak ) तालुक्यातील कोन्नूर या गावचे आहेत. सध्या सोफिया या जम्मू मध्ये कर्नल पदावर सेवा बजावत आहेत. तर त्यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे झाशीमध्ये सेवा बजावत आहेत.
मूळच्या गुजरातच्या असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा 2015 साली बेळगावच्या कर्नल ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी विवाह झाला. त्यांचा हा प्रेमविवाह आहे. पती आणि पत्नी हे दोघेही भारतीय सैन्यात कर्नल म्हणून सेवा बजावत आहेत…
Colonel Sofiya Qureshi Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमुळे चर्चेत
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हल्ले करत अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
भारताच्या या कारवाईची माहिती जगाला देण्यासाठी लष्कराने कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची निवड केली. कर्नल सोफिया यांनी ती निवड सार्थ ठरवत, आपला करारी बाणा दाखवत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यानंतर कर्नल सोफिया यांची जगभर चर्चा सुरू झाली. गुगलवर सोफिया यांच्याबद्दल सर्च केले जाऊ लागले.

कोण आहेत सोफिया कुरेशी ?
– गुजरातमधील बडोद्याच्या रहिवासी
– बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी
– 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत लष्करात दाखल.
– 1999 मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले.
– बहुराष्ट्रीय ‘एक्सरसाईज फोर्स 18 प्रोग्रॅमचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी.
– 2006 मध्ये कांगोत संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात सहभागी.
– 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित.
– पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांच्याकडून प्रशंसापत्र-
– घरात लष्कराचा समर्थ वारसा, आजोबांनी भारतीय सेनेत सेवा केली आहे.
– पती मेजर ताजुद्दिन कुरेशी मेकनाईज्ड इन्फंट्रीचे अधिकारी आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *