पंढरपूर कृषी विभागाचे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन. सन 2025 -26
पंढरपूर कृषी विभागाकडून तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सन 2025 -26 चे आयोजन माननीय आमदार श्री अभिजीत पाटील-माढा विधानसभा सदस्य, माननीय आमदार समाधान आवताडे-पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा सदस्य, माननीय आमदार श्री राजू खरे-मोहोळ विधानसभा सदस्य, तसेच माननीय आमदार श्री डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा सदस्य यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी माढा विधानसभा सदस्य श्री अभिजीत पाटील यांनी कृषी विभागाच्या चालू कामकाजाचा तसेच पुढील कामाचा आढावा घेतला. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ऊस, मका, केळी, डाळिंब, इत्यादी अनेक पिकांच्या उत्पादन वाढीविषयी, तसेच पिकांचे संरक्षण, व प्रामुख्याने शेतकरी अपघात नुकसान बाबत शासन निर्णयानुसार योग्य त्या क्षमतेने लाभ न मिळत असल्याची खंत व्यक्त केली.
तसेच पुढील काळात शेतकऱ्यांना खते खरेदी करताना भेसळ, वाढीव दराने खतांची विक्री इत्यादी अन्य अडचणी असल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण करण्याबाबत क्यू आर कोड ची निर्मिती कृषी विभागाकडून तात्काळ करण्यात यावी. व शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण तात्काळ करण्यात यावे असे मत आमदार श्री अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हुमणी रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून याबाबत कृषी विभागाकडून तात्काळ हुमणी नियंत्रण बाबत घ्यावयाची काळजी व उपाय योजना प्रत्येक गावात मोहीम राबवणे आवश्यक आहे. असे देखील श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी पंढरपूर तालुक्याचे कृषी अधिकारी श्री मोरे यांनी कृषी विभागाकडून चालू असलेल्या कामांची माहिती दिली व पुढील काळात कृषी विभागाकडून माती परीक्षण, शासनाच्या योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजना, पीक संरक्षण, पीक लागवडी बाबत पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.
पंढरपूर तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजनास पंढरपूरचे तहसीलदार श्री सचिन लंगोटे, पंढरपूर पंचायत समितीचे मुख्य अधिकारी श्री सुशील संसारे, पंढरपूर कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री लांडगे, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष श्री सुभाष दादा भोसले, तसेच सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्य असणारे श्री विजयानंद हक्के यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
Leave a Reply