बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास बेदम मारहाण:एकावर मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल

कंदलगाव: बँकेचा हप्ता मागण्यासाठी गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्यास लाकडाने बेदम मारहाण करून डोकं फोडून गंभीर जखमी केले. ही घटना कंदलगांव (ता. द. सोलापूर) येथे घडली. या घटनेची नोंद ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता मंद्रुप पोलिस ठाण्यात करण्यात आली.
याबाबत ऋतुराज बाळासाहेब जाधव (वय २५, रा. मनगोळी, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद नागनाथ उडाणशीव (वय २८, रा. कंदलगांव, ता. द. सोलापूर) याच्यावर भारतीय न्याय संहिता बीएनएस ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ८ मे २०२५ रोजी फिर्यादी हे
सकाळी ८:५५ वाजता कंदलगांव येथे बँकेचा हप्ता मागण्यासाठी घरासमोर गेले होते. बँकेकडून कर्ज घेतले आहे, कर्जाचा हप्ता भरण्याची विनंती केली असता एकाने बँक कर्मचाऱ्यास शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
याचवेळी घराशेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाखाली पडलेल्या लाकडाने बँक कर्मचाऱ्याच्या डोक्यात
जोरात मारहाण करून जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. बँक कर्मचाऱ्यासोबत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गावातील लोकांनी प्रयत्न केला, मात्र भांडण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *