शोएब कुरेशी ए जी पाटील श्री 2025 चा विजेता
गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी KLE शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत शोएब कुरेशी हा ए जी पाटील श्री 2025 चा मानकरी ठरला. या स्पर्धेत 105 स्पर्धकांनी भाग घेतला होता. कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद व उमरगा येथून स्पर्धक भाग घेतले होते. या स्पर्धेसाठी दोन लाख रोक स्वरूपाचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील, सिद्धेश्वर पाटील, शिवानंद पाटील, व राजकुमार पत्रकार सुरवसे उपस्थित होते, स्पर्धा 6 वजनी गट 55 ते 75 किलो वरील घेण्यात आले. प्रत्येकी गटात पाच बक्षिसे सह सम्मानचिन्ह ठेवण्यात आले होती. सहा गटातील प्रथम विजेत्या मध्ये पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यात आली व त्यात शोएब कुरेशी हा टायटल विनर ठरला. तर अकबर कुरेशी याला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले. बेस्ट पोझर अभय जगताप, तर मोस्ट इम्प्रूमेंट मनोहर लाड याला देण्यात आले,
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रमोद काटे, रामकृष्ण चितळे, नरेंद्र कदम, राजेश रागडे, शफी शेतसंधी, उदय पालकर, अरविंद आरते, नजीर शेख, शिरक गडसिंग, शकील बडेघर यांनी काम पाहिले…
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवानंद पाटील व रविकांत पाटील यांनी परिश्रम घेतले…
Leave a Reply