तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जी.एम. संस्थेच्या वतीने खिरिचे वाटप करुन बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी….
जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बुधवार पेठ मिलिंद नगर जी.एम चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन पुष्प फुले अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचे वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश कणेकर एसटी महामंडळाचे अधिकारी शितल बिराजदार साहेब जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे उत्सवा अध्यक्ष अजहर शेख जी.एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड सामाजिक कार्यकर्ते वाहिद विजापुरे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पप्पू गायकवाड म्हणाले की वैशाखी पौर्णिमेच्या या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे म्हणून जगभर वैशाखी पौर्णिमेला बुद्ध जयंती साजरी केली जाते तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांनी अहिंसा, प्रेम आणि करुणा यांसारख्या मूल्यांवर भर दिला. त्यांनी लोकांना दुःख आणि अज्ञानातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, जो म्हणजे निर्वाण प्राप्त करणे. आज जगाची परिस्थिती पाहता जगाला बुद्धांच्या विचाराचे आचरणाची गरज आहे अशा या साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमे निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असे बोलून आपले विचार व्यक्त केले.
या प्रसंगी याप्रसंगी आप्पासाहेब बागले दत्ता शिंदे संजय पोळ आप्पासाहेब गायकवाड मुकेश सोनवणे नरेंद्र शिंदे हर्षवर्धन बाबरे नरेंद्र कदम गौरव पात्रे रवी उर्फ मन्ना कांबळे उमेश गायकवाड महेश बनसोडे आभि क्षिरसागर संतोष कदम संतोष जगताप यशपाल वाघमारे आदित्य वाघमारे निशांत वाघमारे निहाल क्षिरसागर सोहेल शिरसे आकाश जमादार अभिनंदन गायकवाड अविनाश क्षिरसागर रघु बनसोडे तेजस कांबळे सचिन उबाळे मिलिंद तळभंडारे अजय क्षिरसागर सेहवाग चलवदे मेडी दुपारगुडे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply