दक्षिण सोलापूर तालुक्यातील या गावच्या सरपंचास जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..

दक्षिण सोलापूर तालुक्यातील या गावच्या सरपंचास जिल्हाधिकाऱ्यांचा दणका..

दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव चे सरपंच विश्रांती पाटील यांचे सरपंचपद सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे.
आचेगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. ओबीसी राखीव जागेवर निवडणूक लढवून पाटील ह्या विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना पाटील यांनी त्यांच्या नावे कोणत्याही शासकीय जागेवर अतिक्रमण नसल्याबाबत हमीपत्र, शपथपत्र जोडले होते.
वास्तविक पाहाता, आचेगाव ग्रामपंचायतीची गावठाण जागा ही पाटील यांच्या नावावर होती. दरम्यान, त्यांनी सरपंचपदाचा गैरवापर करुन बेकायदेशीरपणे
त्यांच्या नावाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी कमी करुन घेतली. तसेच त्यांनी विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र देखील सदर केले नाही.
या प्रकाराबाबत आचेगाव येथील संजयकुमार अमृतराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पाटील यांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जाच्या अनुषंगे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेली चौकशी व अर्जदाराच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरुन पाटील यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे कागदोपत्री निष्पन्न झाले. परिणामी पाटील यांचे सरपंचपद आणि सदस्यपद अपात्र करण्याचे आदेश कुमार आशीर्वाद यांनी

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *